माजी मुख्यमंत्री पराभूत, विद्यमान मुख्यमंत्री विजयी!
Published on
:
08 Feb 2025, 7:47 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:47 am
दिल्ली, वृत्तसेवा : DelhiElectionResults | आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले. तर मनीष सिसोदिया हे देखील जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले. आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यानंतर दुसरे सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून मनीष सिसोदिया यांना ओळखले जातात. आम आदमी पक्षाचे हे दोन्ही मजबूत स्तंभ उद्ध्वस्त करण्यात भाजपाला यश मिळाले.
दरम्यान कालकाजी विधानसभेतून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आणि मुख्यमंत्री अतिशी यांचा विजय झाला. नवी दिल्ली विधानसभेतून भाजपाचे प्रवेश सिंह वर्मा यांचा विजय झाला तर जंगपुरा मधून भाजप उमेदवार तरविंदर सिंह यांचा विजय झाला. यानिमित्ताने तब्बल २७ वर्षानंतर भाजपने दिल्लीत मोठे कमबॅक केले.
DelhiElectionResults | काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांचा पराभव
काँग्रेसने नवी दिल्ली विधानसभेतून शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली होती. तर कालकाजी मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही जागांसाठी काँग्रेसने पूर्ण ताकद पणाला लावली होती. स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी देखील या ठिकाणी प्रचार केला. मात्र काँग्रेसला आपल्या या दोन्ही प्रमुख नेत्यांना निवडून आणता आले नाही.