माझा अन् ऑडिओचा क्लिपचा काही संबंध नाही:तो आवाज माझा नाहीच, अजित पवार काहीही बोलू शकतात- सुप्रिया सुळे
1 day ago
2
भारतीय जनता पक्षाने काल मला 5 प्रश्न विचारले. माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही. तो आवाज माझा नाही, कुणीही चेक करावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, त्रिवेदी काल म्हणाले की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन दाखवावे, मी काल रात्रीच बाहेर आले. आज तुमच्या माध्यमातून मी विनम्रपणे विनंती करते की, त्रिवेदीजी म्हणतील ती वेळ, जागा, चॅनल, शहरात येऊन मी मनमोकळेपणाने त्यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यासोबत चर्चा करेल. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रवींद्र पाटील हे एक आयपीएस अधिकारी आहेत. ते दोन वर्षे जेलमध्ये राहून आले आहेत. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात मी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी मी यावर चर्चा केली आहे. बिटकॉनविरोधी जर संसदेत कोणी सर्वाधिक बोलले असेल तर मी बोलले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अजितदादा काहीही बोलू शकतात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर हे कसे पुढे आले. अजित पवारांनी तो आवाज सुप्रिया सुळेंचा असल्याचे म्हटले त्यावर अजित पवार काहीही म्हणू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. तर भाजपने केलेल्या आरोपावर मी तक्रार दाखल केली आहे. माझा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे ते मला या प्रकरणात न्याय देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पटोले अन् माझा आवाज नाही सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी ऑडिओ क्लिप त्यात ना माझा आवाज आहे ना तर नाना पटोले यांचा आवाज आहे. हे तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत केलेले काम आहे, असे म्हणत सुळेंनी माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)