माझा मुलगा निर्दोष, आम्ही आजही कल्याणमध्ये भीक मागून जगतोय:न्यायालयीन समितीच्या अहवालानंतर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
3 hours ago
1
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर रोजी पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला होता. मात्र अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचे न्यायालयीन समितीच्या अहवालात म्हंटले आहे. या अहवालावर अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा निर्दोष आहे, आम्ही आजही भीक मागून जीवन जगत आहोत, अशा शब्दांत त्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. न्यायालयीन समितीच्या अहवाल समोर आल्यानंतर अक्षय शिंदेची आई म्हणाली, माझा मुलगा निर्दोष होता. त्याने गुन्हा केलाच नव्हता. माझा मुलगा सत्य होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलांवर बलात्काराचा आरोप टाकला होता, आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी त्याला मारून टाकले, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना अक्षय शिंदेची आई म्हणाली, न्यायालयातील सादर करण्यात आलेल्या अहवलामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता. कोर्टाने त्या लोकांना सजा दिली आहे. माझा मुलगा सत्य होता, तर ते सत्यच झाले आहे. आम्हाला कुठेही काम नाही, आम्ही कल्याणमध्ये आहोत. अजूनही कल्याणमध्ये भीक मागून खात आहोत. तसेच अक्षय शिंदेच्या आईने कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, अक्षय शिंदेने बदलापूर येथील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरसह महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी देखील सत्ताधारी सरकारवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे या प्रकरणात कारवाईसाठी पोलिसांवरही दबाव निर्माण झाला होता. त्यात पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेचा झटापटीत एन्काऊंटर करण्यात आला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)