अलिबाग विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटीलpudhari
Published on
:
18 Nov 2024, 4:44 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:44 am
रायगड | शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या मतदार संघात जनसेवेचे काम केलेले आहे. संपर्ण महाविकास आघाडी माझ्या सोबत आहे. त्याच बरोबर मी सुद्धा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत आले आहे. मग कोविड आपत्ती असेल वा चक्रीवादळे असतील या वेळी मी काम केले आहे. येथील मतदार सुशिक्षीत आहे. यूवा मतदार देखील माझ्या सोबतच आहे. शिंदे गटाच्या ज्या लोकांनी बंड केले, गुवाहाटीला गेले, 50 खोके घेतले त्या खोकेवाल्यांना पाडायला उभा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या सर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर माझ्या विजयाची पताका निश्चित आहे, असा आत्मविश्वास अलिबाग विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील तथा चिऊताई यांनी व्यक्त केला आहे.
मी स्वतःला भाग्यवान समजते की मी शेतकरी कामगार पक्षाची आहे, आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पार्टी हे मोठे पक्ष माझ्या पाठीशी आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रियाताई सुळे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि काँग्रेसमधील सर्व नेत्यांचे आभार मानते.
शिवसेनेची तागद या मतदार संघात असून ते आज जोरात काम करत आहेत. आम्हा सर्व मंडळींची राज्यात ईमेज स्वच्छ आहे.कोणताही डाग नाही, म्हणूनच मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघात शेकापचा निष्ठावान मतदार आहे. शेकापचा मतदार हा ठाम असतो. शेकापच्या चार पिढ्या एका झेंड्या खाली आहेत. पाटील घराण्याची सून म्हणून माझा सर्वांशी सातत्यपूर्ण संपर्क आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. ही सर्व मते मला मिळाणार आहेत यात कोणतीही शंका नाही असा विश्वास व्यक्त करुन चित्रलेखा पाटील म्हणाल्या, मला खूप अभिमान आहे. ज्या विचारांने शेकापने येथे गेली अनेक वर्ष काम केलेय, त्याच्या आठवणी ज्यावेळी मी गावांगावांत जाते तेव्हा त्यावेळी सर्वजण मला आवर्जून सांगतात. शेकाप नेते अॅड.दत्ता पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते होते. त्यांनी संघर्षातून जनसामान्यांना न्याय मिळऊन दिला, तर स्व.भाऊ प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून गावागावांत शाळा बांधून ज्ञानगंगा गावागावांत पोहोचवून मुलांना शिक्षण उपलब्ध करुन दिले. भाई जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत तर स्व.मिनाक्षीताई पाटील यांनी विधानसभेत रायगडचे प्रश्न मांडून विधीमंडळे गाजवत येथील जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे येथील जनतेला पाटील कुटुंबाबाबत एक आगळी आत्मियता मतदार संघात आहे. याच पाटील कुटूंबाची सून म्हणून ते मतदान मला करुन निश्चित आशिर्वाद गेथील असा दृढ विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
अलिबाग विधानसभा मतदार संघात महिलांकडून आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठींबा मिळत आहे. 20 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांशी माझा अखंड संपर्क आहे. या बचत गटांना मी प्रशिक्षण देऊन त्यांना कायम स्वरुपी रोजगार व उद्योग उपलब्ध करुन दिेल आहे. सावित्रीच्या लेखी चालल्या पूढे... या माझ्या उपक्रमांतर्गत आता पर्यंत मी 25 हजार शालेय विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप केले आहे. त्यातूनच सर्व महिलां बरोबर माझे दृढ नाते निर्माण झाले आहे.
पाण्याचा प्रश्न येथे आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याची जबाबदारी माझी आहे असा शब्द मी महीलांना देत आहे. या शिवाय ग्रामस्तरावर भाकरी भवन आणि बचत गट भवन उभारण्याचा मनोदय आहे. त्यातून महिलांना गावांतच कायम स्वरुपी रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. माझ्या यूवा मतदारांसाठी क्रिडा आणि शिक्षण क्षेत्रात काम करितच आहे. त्यांच्यासाठी करियर कौन्सिलींग करीत असतो. त्यातून यूवा व महिलांचा खर्या अर्थाने विकास साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
रायगड जिल्ह्यात शेकापने सहकार रुजवीला आहे. येत्या काळात सहाकारी संस्थांच्या माध्यमातून युवकांना नोकर्या उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक घरात महिलेला नळाने पाणी, आरोग्य सुविधा विकास यास आपले प्राधान्य राहाणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगीतले.
‘आमिषाचे राजकारण बंद झाले पाहिजे’
शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी पन्नास खोके घेतले मात्र जनतेचे काम केले नाही. त्याच खोक्यातील पैशाचे आमिष मतदारांना ते दाखवत आहेत, मात्र मतदारांना हे सर्व कळून चूकले आहे. चिखलात लोळण्याचे आणि आमीषाचे राजकारण बंद झाले पाहीजे या मताची मी आहे. त्याच्याकडे मनीपॉवर आहे, मात्र मतदार महाविकास आघाडीला विजयी करुन त्यांना चोख उत्तर देणार आहेत असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी अखेरीस व्यक्त केला आहे.