माढ्यातील मतमोजणीचे ठिकाण बदलणे अन्यायी:बचाव संघर्ष समितीचा रास्ता रोको, उद्या तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा

2 hours ago 1
प्रशासकीय अडचण सांगून मतमोजणीचे ठिकाण माढ्यातून कुर्डुवाडीत जात असेल तर हा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा माढ्यात झालेल्या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी देण्यात आला. माढा शहर प्रशासकीय बचाव संघर्ष समितीच्या वतीने माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी माढा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कुर्डुवाडीत करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. आंदोलनातील पुढचा टप्पा म्हणून बुधवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून, गुरुवारपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. माढ्यात मंगळवारी सकाळी ११ वाजता हालगीनाद करीत आंदोलनाला सुरुवात झाली. दोन तास रास्ता रोको केला. प्रशासकीय संघर्ष समितीचे दिनेश जगदाळे, नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे, दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे, राष्ट्रवादीचे झुंजार भांगे यांनी प्रशासनावर कोरडे ओढले. या वेळी शिवसेनेचे ऋतुराज सावंत, अमर पाटील, नगरसेवक अरविंद खरात, काँग्रेसचे जहीर मणीर यांच्यासह सर्वपक्षीय उपस्थित होते. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे संजय कोकाटे म्हणाले, माढेकरांना नेहमीच प्रशासनाच्या जुलमी निर्णयाविरोधात रस्त्यावर उचलण्याची दुर्दैवी वेळ येते. फक्त आंदोलने करून प्रश्न मार्गी लागणार नाही. प्रशासनाची उदासीनता झाल्याने नागरिकांतही उदासीनतेचे चित्र निर्माण झाले आहे. माढ्याचा अपेक्षित विकास झाला नसून, टेभुर्णी शहराने प्रगतीचे शिखर गाठले. माढ्याचा त्याहून अधिक विकास झाला पाहिजे. माढ्याचे तहसीलदार रणवरे यांची कार्यपध्दतीवर पाहता ते तहसीलदार आहेत की कोतवाल असाच प्रश्न काम घेऊन आलेल्या नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article