Published on
:
28 Nov 2024, 4:48 am
Updated on
:
28 Nov 2024, 4:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सायबर गुन्ह्याशी संबंधित छापा टाकताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे, असे वृत्त ANI ने दिले आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सायबर गुन्ह्याशी संबंधित छापा टाकताना हा धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीतील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेबाबत तपास यंत्रणेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. हा तपास PPPYL सायबर ॲप फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणातील कथित आरोपींमध्ये अशोक शर्मा आणि त्याच्या भावाचा समावेश आहे.
An Enforcement Directorate team (ED) was attacked in Delhi's Bijwasan area while conducting raids. Five people were there and one of them ran away. The premises are secured andan FIR is being filed. One Additional Director of ED was injured in the incident.
(Source: Enforcement… pic.twitter.com/VdzASrd7J6
— ANI (@ANI) November 28, 2024अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने आज देशभर कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर क्राइम नेटवर्कशी जोडलेल्या टॉप चार्टर्ड अकाउंटंट प्रकरणी व्यापक शोध मोहित सुरु केली आहे. यामध्ये फिशिंग घोटाळे, क्यूआर कोड फसवणूक आणि अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांसह हजारो सायबर गुन्ह्यांमधून व्युत्पन्न केलेल्या बेकायदेशीर निधीच्या लाँड्रिंग समावेश असून, या कारवाई अंतर्गतच दिल्लीत छापे टाकण्यात आले.
The Enforcement Directorate’s High-Intensity Unit (HIU) launched extensive searches today targeting top chartered accountants allegedly linked to a massive cybercrime network operating across India. The raids follow an investigation that uncovered the laundering of illicit funds… https://t.co/Ea93i7lw2J
— ANI (@ANI) November 28, 2024