मोहटा देवीच्या दरबारात खडा पहारा, घटी बसणाऱ्यांची संख्या दीड हजारांवर:समस्यांच्या जंजाळातून मनःशांती मिळवण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त

2 hours ago 1
कोणाचे कुटुंब व्यसनमुक्त झाले, कुणाचे आरोग्याचे प्रश्न सुटले, कुणाच्या वैवाहिक समस्या दूर झाल्या, तर कोणी असाध्य आजारातून बरे झाले. समस्यांच्या जंजाळातून मनःशांती मिळवण्यासाठी मोहटा गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. मोहटा देवस्थानात यंदाच्या नवरात्रोत्सवात खडा पहारा व घटी बसणाऱ्यांची संख्या सुमारे दीड हजारांवर आहे. चार दिवस नवरात्रात घटी बसणाऱ्या साधकांची अनुभूती तर वेगळीच असते. देवीच्या दरबारात काही भाविक अष्टमी होमापर्यंत विशिष्ट व्रत आचरण करतात. राज्याच्या विविध भागातून येथे भाविक नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधी येतात. गड परिसरात अहोरात्र भ्रमंती करताना आरती, हरिपाठ, कथा कीर्तन सेवेत सहभागी व्हायचे. कथा, कीर्तन ऐकायचे. असा पहारा देताना साधक जमिनीला पाठही टेकवत नाहीत. जरा विश्रांती घ्यायची असली, तरी ओट्यावर पोट टेकून अथवा काठीच्या आधाराने भिंतीला टेकून विश्रांती घेतली जाते. देवीची कृपा होऊन जीवनाचे कल्याण व्हावे, या भावनेने नवरात्रात देवीपुढे व्रतस्थ राहून विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. घटातून प्रसारित होणारी ऊर्जा मिळावी, यासाठी देवी मंदिराला प्रदक्षिणा घालत देवीचा महिमा गात महिला भाविक जागर, शक्तिगीते गातात. देवीच्या घटात ३३ कोटी देवता आश्रयासाठी आल्याने त्यांचे सानिध्य आपल्याला लाभावे, अशीही भावना घटी बसण्यामागे असते. देवस्थान समितीतर्फे या भाविकांसाठी निवास व महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. करंजी येथील जयश्री पाठक यांनी कौटुंबिक समस्या दूर होण्यासाठी नवस केला, त्याची पूर्तता झाल्याने पाच वर्षे त्या खडा पहारा देवीच्या दरबारात देत आहेत. नगरच्या शोभा वैरागळ यांच्या नातीची असाध्य आजारातून देवीने सुटका केली, म्हणून देवीपुढे खडा पहारा देत आहेत. खडा पहारा देणाऱ्या स्त्री-पुरुष भाविकांची संख्या सुमारे एक हजार असून, सुमारे दोन हजार भाविक घटी बसले आहेत. सर्व जण मिळून सायंकाळी संपूर्ण देवी गडाला वाजतगाजत भजने, अभंग, हरिपाठ म्हणत प्रदक्षिणा घालतात. हिराबाई थोरात (मालेगाव), तुषाला वाघ (जालना), अलका वाघ (परभणी), वनिता बेळगे (वाळुंज), लता पोपळघट (बीड), रेणुका बारवेकर यांनी घटी बसण्याबाबत व खडा पहारा देण्यासंबंधी दिली. श्रद्धा, भक्ती, निष्ठा अन् सेवेचा संयुक्त अविष्कार त्यातून प्रकट होतो. साधकच खरे वैभव देवस्थान समितीतर्फे होणारी व्यवस्था, प्रशस्त व स्वच्छ परिसर जागृत देवस्थान असल्याने भाविक येथे मोठ्या संख्येने येतात‌. मोहटा देवस्थानात येणारे साधक म्हणजे उत्सवाचे खरे वैभव असून, या साधकांचा सेवाभाव प्रेरणादायी असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article