म्हातोबा टेकडीवरील आगीतून वाचली २५०० झाडे:तज्ज्ञांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांना यश, पाटलांकडून समाधान व्यक्त

2 hours ago 1
पुण्यातील कोथरूड येथील म्हातोबा टेकडीवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टवाळखोरांनी लावलेल्या आगीतून २५०० झाडे वाचवण्यात यश आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पाटील यांनी त्यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त (१० जून २०२४) ६५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्याअंतर्गत म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या वृक्षांच्या संवर्धनासाठी पाण्याचे पाईप, टाक्या, खते यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि देखरेखीसाठी सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दुर्दैवाने, काही टवाळखोरांनी या झाडांना आग लावून नुकसान पोहोचवले, ज्यामुळे २५०० झाडांना झळ बसली. या घटनेनंतर मंत्री पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. झळ बसलेल्या झाडांना वाचवण्यासाठी आठ जणांची तज्ज्ञ टीम नेमण्यात आली. वन विभाग आणि स्थानिक कोथरुडकरांच्या सहकार्याने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आता या झाडांना नवी पालवी फुटली आहे. शुक्रवारी या यशस्वी प्रयत्नांबद्दल बोलताना मंत्री पाटील यांनी सर्वांच्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद व्यक्त केला. पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे म्हातोबा टेकडीवरील हिरवळ पुन्हा एकदा बहरली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article