यंदा 2019 च्या तुलनेत 7 टक्क्याने मतदान वाढले:उमेदवारांत धाकधूक, लाडकी बहीण, शेतमालास अल्प भाव असल्याचा परिणाम
6 hours ago
1
अमरावती विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मतदानात ७ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा १० टक्के अधिक महिलांनी मतदानाचे कर्तव्य बजावले आहे. एकंदरीत लाडकी बहीण योजना, शेतीमालाला अल्प भाव, आल्हाददायक वातावरण या कारणांमुळे टक्का वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण मतदानात सात टक्क्याने वाढ झाल्यामुळे महायुती, मविआ आणि अपक्ष उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक वाढल्याचे चित्र गुरुवारी दिसत होते. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांचा विचार करता मोर्शीत मतदारसंघात सर्वाधिक १२ मतदान वाढले. त्यापाठोपाठ तिवस्यात ९ टक्क्यांनी वाढ आहे. या दोन मतदारसंघा व्यतिरीक्त इतरही मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात वाढ आहे. एकंदरीत मतदारांनी मतदानाबाबत दाखवलेली जागृती अनेकांची धाकधूक वाढवणारी ठरत आहे. निवडणुकीचा निकाल अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपला आहे. मात्र वाढलेल्या मतदानामुळे काहींना अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती मतदारसंघात ११०९९७ पुरुष तर १००५९९ महिला असे एकूण २११६०६, बडनेरा : १०८४६५ पुरुष तर १०१३२९ महिला असे एकूण २०९८०९, धामणगाव रेल्वे : ११७२२२ पुरुष तर १०४४९७ महिला असे एकूण २२१७१९, तिवसा : १०७४५८ पुरुष आणि ९३९५४ महिला असे एकूण २०१४१२, दर्यापूर : ११०६८३ पुरुष आणि ९५५०० महिला असे एकूण २०६१८८, मेळघाट : ११४५२३ पुरुष तर १०६३८६ महिला असे एकूण २२०९१३, अचलपूर : ११२१३१ पुरुष तर ९८४८२ महिला असे एकूण २१०६१४, मोर्शी : १०९५१९ पुरुष तर ९९१०० महिला असे एकूण २०८६१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारसंघ २०१९ २०२४ वाढ मोर्शी ६६ ७७.६६ ११.६६ तिवसा ५८.५४ ६७.९३ ९.३९ मेळघाट ६५.४५ ७३.१४ ७.७३ अमरावती ४९.४३ ५६.५१ ७.०८ बडनेरा ५२.०७ ५७.६७ ५.०६ धामणगाव ६६.४४ ६९.७५ ३.३१ दर्यापूर ६३.६८ ६६.८५ ३.१७ अचलपूर ६७.०३ ६८.८४ १.८१ एकूण ५९.३६ ६६.४० ७.०४ मतदारसंघ लोकसभा विधानसभा वाढ मोर्शी ८३४२६ ९९१०० १५६७४ तिवसा ८२१९२ ९३९५४ ११७६२ मेळघाट ९७१२३ १०६३८६ ९२६३ अमरावती ९२०५८ १००५९९ ८५४१ बडनेरा ८७७३४ १०१३२९ १३५९५ धामणगाव ८६९६६ १०४४९७ १७५३१ दर्यापूर ९०२७६ ९५५०० ५२२४ अचलपूर ८७८०३ ९८४८२ १०६७९ एकूण ७०७५७८ ७९९८४७ ९२२६९ जिल्ह्यात मतदान वाढल्याची दोन प्रमुख प्रमुख कारणे समोर येत आहेत. त्यात लाडकी बहीण आणि शेतीमालास अल्प भाव यांचा समावेश आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांत वाढ झाल्याने त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. तर सोयाबीन व कापसाला चार वर्षांपूर्वी असलेलाच भाव यंदाही मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितच नाराजी आहे. त्यामुळे त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. मागील पंचवार्षिकमध्ये शेतकरी आत्महत्या थांबवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले नाही. त्यासाठी काय केले जाऊ शकते, हा मुद्दाही प्रचारात या वेळी दिसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मतमोजणीसाठी लोकशाही भवनात अशी व्यवस्था केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)