भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने दोन ठार झाल्याची घटना घडली.File Photo
Published on
:
15 Nov 2024, 2:02 pm
Updated on
:
15 Nov 2024, 2:02 pm
यवतमाळ : भरधाव दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. बाभुळगाव तालुक्यातील खडकसावंगा ते बेंबळा धरण मार्गावर आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. तेजस पुंजाराम सोयाम (वय २०) आणि शिवानी संजय सुरपाम (वय १९ रा. मलापुर ता. बाभुळगाव) अशी मृतकांची नावे आहे.
बाभुळगाव तालुक्यातील वीरखेड येथील रहिवासी असलेला तेजस सोयाम व शिवानी सुरपाम दे दोघेही दुचाकीने जात होते. दरम्यान वळणावर भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट रस्त्यालगाच्या झाडावर जाऊन धडकली. दुचाकी झाडाच्या टणक बुंध्यावर आदळल्याने दोघांच्याही डोक्याला व हनुवटीला जोरदार मार लागला. यात युवती जागेवरच गतप्राण झाली तर युवकास प्राथमिक उपचारास ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे दाखल करण्यात आले. तोवर त्यानेही प्राण सोडला होता. अपघात झाल्यानंतर खडकसावंगा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. बाभुळगाव पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून अपघातग्रस्तांना बाभुळगाव येथील रुग्णालयात दाखल केले.