"यशोरंग'मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन:नेवासे फाटा येथे मुळा शिक्षण संस्थेत ज्ञानेश्वर महाविद्यालयात कलाविष्कार उत्साहात
4 hours ago
1
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासे फाटा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयात वार्षिक यशोरंग कलाविष्कार सोहळ्यानिमित्त आयोजित विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम कलाकार विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्तगुणांचे दर्शन घडवले. गायन, नृत्य, एकांकिका, नाटक, कविता आदीसारख्या विविध कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धनंजय जाधव, सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक गीतकार व लेखक सूर्यकांत भालेराव, ग्रामीण लेखक प्रा. पोपटराव वरूडे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. अरुण धनवट, उपप्राचार्य प्रा. राधा मोटे, प्रा. मंदाकिनी थावरे, प्रा. ज्ञानेश्वर पुराणे, क्रीडा विभागाचे प्रा. सुनील गर्जे, डॉ. रवींद्र खंदारे, डॉ. बाळासाहेब जगताप, प्रा. गोवर्धन रोडे, प्रा. देवीदास साळुंके, प्रा. अमोल जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कवी सूर्यकांत भालेराव म्हणाले, आपल्या उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन व त्यात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे महत्त्वाचे व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन आपल्या सुप्तगुणांची उधळण करावी, असे आवाहन केले. प्रा. पोपटराव वरुडे म्हणाले, मुळा एज्युकेशन सोसायटीने नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिकसह विविध उपक्रम राबवून प्रोत्साहन देत हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. मच्छिंद्र वर्पे, प्रा. योगेश साळवे, प्रा. नितीन भोगे, प्रा. निवृत्ती मिसाळ, प्रा. अजय पाटील, प्रा. दिगंबर सोनवणे, प्रा. यशवंत आहेर, डॉ. कार्तिकी नांगरे, प्रा. मयूर जामदार, प्रा. संदीप तोगे, प्रा. सुजय नवले, प्रा. रामराव काळे आदींनी सहकार्य केले. संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)