येवल्यात जरांगेंचा दौरा; 2 माइक हाती घेत भुजबळांना उद्देशून म्हणाले...:‘एक बिघडलाय, नवा पाहिजे, आवाज क्लिअर येईल’
5 days ago
2
‘माझ्या हाती माइक दोन-दोन आहेत. एक बिघडलाय. डोक्यावर परिणाम झालाय. लोक वायरिंग बदलून कंटाळले आहेत. आता नवा माइक हवा म्हणजे आवाज क्लिअर येईल. न्यायाचा आवाज येईल,’ असा टोला मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यात भुजबळांचे नाव न घेता लगावला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, असा संदेश देत मनोज जरांगे पाटील दौरे करत आहेत. येवल्यात येण्यामागचे कारण विचारले असता ते म्हणाले की, हा काही निवडणूक दौरा नाही. पारेगावातील एका कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीला आलाे होतो आणि येवला काय महाराष्ट्राबाहेर आहे का? गरिबांवरची दहशत दूर करायची आहे. आपल्याला येवल्याला पवित्र करायचे आहे. बाकी कुणाला पाडायचे हे कळायला मराठा समाज फार हुशार आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. गवंडगाव, अंदरसूल येथे मराठा समाजाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे जरांगे म्हणतात ते बरोबर आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार आम्ही कोणी मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही.’ कुणाला पाडायचे ही सांकेतिक भाषा मराठा समाजाला कळते- जरांगे पाटील पाडापाडीचा अर्थ काय? मराठ्यांना सांकेतिक भाषा कळते. लोकसभेला बरोबर कळली. आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना ते पाडणारच. फडणवीसांवरच राग का? त्यांचा विरोध आहे म्हणूनच आरक्षण मिळत नाही. १० टक्के स्वतंत्र आरक्षण मागितले नव्हते. ओबीसीतूनच आरक्षण हवे. कुणाचे किती सीट पडतील? समाजाच्या हातात निवडणूक दिली आहे. आरक्षण, जात आणि आपले मूल डोळ्यासमोर ठेवा असे समाजाला सांगितले आहे. त्यांचा अधिकार आहे. निकालानंतर पुढे काय? सरकार कुणाचेही येवो आरक्षणासाठी आंदोलन करावेच लागणार. सरकार आल्यावर दुसऱ्याच दिवशी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू होईल. प्रत्येक मराठा कुुटुंबातील एक जण सहभागी होईल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)