रणनीती आखता आली नाही:राजनीतीचे इंजिन पुन्हा बंद, मुंबई मनपावर लक्ष केंद्रित करतील

2 hours ago 1
नुसत्या आक्रमक भाषणांवर पक्ष चालत नाही. त्यासाठी मजबूत पक्षसंघटनाही हवी, भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. याकडे दुर्लक्ष केल्याने राज यांचे इंजिन पुन्हा एकदा स्टेशनवरच बंद पडले. संधी होती तेव्हा पक्षसंघटना बांधली नाही 1 धरसोड करणारा, राजकीय भूमिका दर निवडणुकीत बदलणारा नेता ही प्रतिमा पुसून टाकण्यात यश आले नाही. 2 २००९मध्ये विधानसभेत मोठे यश मिळाल्यावर पक्षबांधणीकडे अजिबातच लक्ष दिले नाही. ३ विधानसभेसाठी उमेदवार देण्यापूर्वी भाजप, विशेषत: एकनाथ शिंदेंना विश्वासात घेतले नाही. 4 प्रत्यक्षात येऊ शकेल असे कोणतेही ठोस, विश्वासार्ह आश्वासन देऊ शकले नाही. २०१९ विधानसभेला कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेने एकमेव विजय मिळवला होता. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. भाजपची दोन जागांची ऑफर धुडकावली. ती स्वीकारली असती तर आज चित्र वेगळे असते. लोकसभेप्रमाणे महायुतीत सहभागी होण्याची संधी होती. पण ती त्यांनी नाकारली. स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article