राज ठाकरे सोबत आले तर महाराष्ट्रात क्रांती घडवू:शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी केले आवाहन

6 days ago 4
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी आज दसरा मेळावा निमित्त पॉडकास्टवरून महाराष्ट्राच्या जनतेला संदेश दिला आहे. तसेच जनतेने आता मतदानाच्या शास्त्राचा वापर करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. खरे सोने विकायचे असेल तर आपली वज्रमूठ एक असली पाहिजे. तुम्ही सोबत आले तर महाराष्ट्रात क्रांती घडवू. असे संजय शिरसाट यांनी आपले मत व्यक्त करत राज ठाकरे यांना थेट महायुतीमध्ये सामील होत पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. राज ठाकरे काय म्हणाले? राज ठाकरे म्हणाले, ही क्रांतीची वेळ आहे. महाराष्ट्रात वेड्या वाकड्या युत्या आणि आघाड्या करण्यात आल्या आहेत. या सर्वांचा वचपा घेण्याची वेळी आहे. राज ठाकरे यांच्या याच विधानावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सगळ्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राची प्रगती कुठे पाहता? महाराष्ट्राची प्रगती कुठे सुरू आहे. नुसते रस्ते बांधणे आणि फ्लायओव्हर किंवा उड्डाणपूल बांधणे म्हणजे प्रगती नसते. कलर टीव्ही आणि मोबाईल म्हणजे प्रगती नव्हे राज ठाकरे म्हणाले, हातामध्ये मोबाइल फोन आले, घरात कलर टीव्ही आला, हे गॅझेट्स म्हणजे तुमची प्रगती नव्हे. प्रगती बुध्दीने व्हावी लागते. प्रगती समाजाची व्हावी लागते. ज्यावेळी आपण जगात किंवा परदेशात जातो आणि तिथली सुविधा पाहतो, त्याला प्रगत देश म्हणतात. अजुनही आपण चाचपडत आहोत. इतक्या वर्षांपासून प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्या मनातील राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना निवडून देता. त्यानंतर पश्चातापाचा हात डोक्याला मारत, बोंबा मारता, असे यावेळी करु नका, क्रांती करा, असे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा जनतेला आवाहन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article