Published on
:
23 Nov 2024, 7:51 am
Updated on
:
23 Nov 2024, 7:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होतआहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पिछा़डीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ९ व्या फेरीअखेर ठाकरे गटाचे महेश सावंत यांना 26457 मते मिळाली असून 6099 मतांनी आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना 20358 मिळाली आहेत. अमित ठाकरे 13990 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
माहीम सुरुवातीपासून शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून स्वतःचा पक्ष स्थापन केल्यामुळे या विधानसभेत मराठी मतांची विभागणी होऊन, शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले होते. 2014 व 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेने जिंकली. 2009 मध्ये मनसेची लाट असल्यामुळे या मतदारसंघात मनसेचे नेते नितीन सरदेसाई निवडून आले होते. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही माहीम मतदारसंघात मनसेचे नगरसेवक निवडून आले; पण मनसेला माहीम मतदारसंघावर वर्चस्व टिकवता आले नाही. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मराठी मतांची विभागणी होऊनही शिवसेनेचे सदा सरवणकर निवडून आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपनेही माहीममधून निवडणूक लढवली होती. यात त्यांनी तब्बल 24 टक्के मते घेतली होती. त्यामुळे शिवसेनेला येथे 5,900 चे मताधिक्य मिळाले. 2019 मध्ये मात्र सरवणकर यांनी विजय मिळवला होता.
गेल्या 5 वर्षांत राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यामुळे साहजिकच माहीम विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितही बदलून गेले. अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे या मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेने थेट राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उतरवले. ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिक असलेल्या विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. सध्याच्या आकडेवारीनुसार महेश सावंत आघाडीवर आहेत.