संविधानामुळे एकतेचा संदेश, सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदताहेत:आ. जगताप यांचे प्रतिपादन, आंबेडकरी समाजातर्फे संविधान वाचन करून प्रत वाटप‎

2 hours ago 1
भारत देशाच्या भूमीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क मिळाला आहे, आज या राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाले, त्या राज्यघटनेनुसार आपण समाजात म करत आहोत, संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो, संविधानामुळे एकतेचा संदेश दिला जात असून सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिनानिमित्त मार्केटयार्ड समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे,प्रकाश भागानगरे, प्रा. माणिक विधाते, सुमेध गायकवाड, अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, सिद्धार्थ आढाव, संजय खामकर, अमित काळे, बाली बांगरे, अंकुश मोहिते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या शहरामध्ये लवकरच उभारला जाणार आहे. त्याची प्रतिकृती दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात बसवण्यात आली आहे आणि दुसरा आपल्या शहरात बसवण्यात येणार आहे . सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली आहे. घटनेमुळे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सूत्रे आली व संविधान एका समाजापुरता नसून सर्व भारतीयांचा आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वातंत्रता प्रस्थापित झाली असल्याची भावना व्यक्त केली. संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शपथ घेतली. मुंबई पोलिसांनी नेहमीच जनतेचे संरक्षण केले मुंबईतील येथे २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र मुंबई पोलिसांनी नेहमीच आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेचे संरक्षण करण्याचे काम केले आहे. दहशतवाद्यांना एक हात करीत त्यांचा खात्मा करण्याचे काम केले असल्याचे मत आ. जगताप यांनी व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article