वॉरन बफे यांनी त्यांची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. Pudhari Online
Published on
:
27 Nov 2024, 5:15 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगप्रसिद्ध गुंतवणूकदार व उद्योगपती वॉरेन बफे यांनी 'बर्कशायर हॅथवे'चा 1.14 बिलियन अमेरिकन डॉलर किंमतीचा स्टॉक फोर फॅमिली फाउंडेशनला दान करण्याचा निर्णय घेतला. अब्जाधीशांनी आपली मालमत्ता कशी वितरण होणार, याची योजना देखील शेअर केली आहे.
९४ वर्षीय वॉरन बफे यांच्याकडे 1,600 बर्कशायर क्लास ए शेअर्सचे शेअर होते. 2.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या शेअरचे क्लास बी शेअर्समध्ये रूपांतर करणार आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. बॅफे यांच्या १५ लाख शेअर्स त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावावर असलेल्या सुसान थॉम्पसन बफेट फाऊंडेशनला तर ३ लाख शेअर त्यांच्या मुलांच्या फाउंडेशन, शेरवुड फाऊंडेशन, हॉवर्ड जी यांना देणार आहेत. उर्वरित शेअर बफे फाऊंडेशन आणि नोव्हो फाऊंडेशनला देणार आहे.
2010 मध्ये, बफे यांनी त्यांचे मित्र बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासमवेत 'गिव्हिंग प्लेज' सुरू केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती दान करतील. चार वर्षांपूर्वी त्यांनी गेट्स फाऊंडेशन आणि त्यांच्या मुलांशी संबंधित फाउंडेशनला मोठ्या प्रमाणावर देणगी देण्यास सुरुवात केली आहे.
मालमत्तेबाबत मुलांवर विश्वास व्यक्त केला
2006 पासून बफेट यांनी त्यांची मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला होता. वॉरन बफे यांनी सांगितले की, उर्वरित संपत्ती त्यांच्या मृत्यूनंतर दान केली जाईल, त्यांच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी आणि वितरणासाठी त्यांचा त्यांच्या मुलांवर विश्वास आहे. मात्र, त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्ता वितरणासाठी तीन वारस म्हणून मुलांची नियुक्ती केली आहे. भविष्यातील निर्णयांना त्यांच्या मुलांची संमती आवश्यक असेल, असेही बफे यांनी स्पष्ट केले.