माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी रायगडातील अनेक पायी दिंड्या अलंकापुरीत दाखल झाल्या आहेत. Pudhari
Published on
:
27 Nov 2024, 5:15 am
Updated on
:
27 Nov 2024, 5:15 am
रविवारपासून आळंदी अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पायी दिंडीसह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधी संजीवनी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजीवनी समाधी सोहळ्याकरीता या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
पंढरपुरातील विठ्ळाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुंडलिकराय यांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत तर कोकण भागातून ठाणे, रायगड, रत्नागिरी, तसेच मुंबई या अनेक जिल्ह्यांतून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे. हातात भगव्या पताका कपाळी बुक्का, केसरी गंध, गळ्यात तुलशीच्या माळा अन मुखातून ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो भाविकांची असंख्य पावले आपल्या घराण्यातील अविरतपणे व परंपरेने चालत आलेली संप्रदायिक वारी संत महात्म्य कीर्तनकार, प्रवचनकार, फडककरी, माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी आळंदी अलंकापुरीत येऊन दाखल होत भक्तीचा तसेच या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आले आहेत.
नाशिक अहमदनगर, नाशिक औरंगबाद, बिड, शिरूर, कोकण प्रांतातून कोकणवाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वानन्द सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या पाऊलावर पाऊल टाकत ठाणे, रायगड व रत्नागिरी तळ कोकणातून त्यांचे अनुयायी विविध फडकरी यांच्या प्रेरणेने सर्वाधीक म्हणजे अधिक पायी दिंड्या आळंदीत या संजीवनी समाधि सोहळ्यासाठी दिंडी सह लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटेपासूनच भाविकांची गर्दी
दरम्यान कार्तिकी एकादशीनिमित्ताने गेली तीन दिवसांपासूनच पहाटेपासूनच माऊलींच्या दर्शनबारीच्या रांगेतही भाविकांची गर्दी ओसंडून लागली असली तरी महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी धातुशोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. मंदिरासह आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. तसेच आळंदी नगर परिषद प्रशासनाकडून कर्मचारी व पुणे जिल्हा पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेसह विविध यंत्रणा देखील यासाठी कमालीची सुसज्य झाली असून भाविकांना उत्तम प्रकारे शासकीय यंत्रणेद्वारे सहकार्यातून सहकार्य करत असून भक्तग्णांना माऊलीचे दर्शन घडत आहे.