राज्याच्या सीएमपदाबाबत निवडणुकीनंतर निर्णय:कुणालाच प्रतिस्पर्धी मानत नाही; बाळासाहेबांच्या वारसाने त्यांचे विचार व स्वप्नं उद्ध्वस्त केली- एकनाथ शिंदे

6 days ago 2
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. मी कुणालाच माझा प्रतिस्पर्धी मानत नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, कुणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवत असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. त्यांना दोन्ही ठाकरेंना आपण प्रतिस्पर्धी मानतात का हा प्रश्न विचारण्यात आल त्यांवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या 3 इच्छा ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्या. ज्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर, दुसरी म्हणजे जम्मू-काश्मीरमधून 370 कलम रद्द करणे यासह सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे स्वप्न दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण झाले. त्यांच्या वारसाने त्यांचे विचार व स्वप्नं उद्ध्वस्त केली, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. अजितदादांसोबत राजकीय युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांना सोबत घेण्याच्या भाजप निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना अन् भाजपची युतीही वैचारिक आहे. तर अजित पवार यांच्यासोबतची युती ही राजकीय स्वरुपाची आहे. राज्यातील विकास अन् नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजित पवार यांनी मविआतून बाहेर पडत महायुतीला साथ दिली आहे. निवडून येणं हेच महत्त्वाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूक लढत असताना निवडून येण्याची क्षमता हीच एक गोष्ट केवळ लक्षात घेण्यात आली आहे. यातून आम्ही भाजपचे काही लोकं आमच्याकडे घेतली तर आमची काही लोकं त्यांना दिली आहे. ज्या मतदारसंघात जशी निवडून येण्यासाठी गरज आहे, तशी भूमिका घेण्यात आली आहे. आमच्याकडे मविआसारखे जागावाटपावरुन वाद नाही नाही. महायुतीचा विजय हेच आमचे ध्येय असल्याचे सीएम शिंदे यांनी ठाणे लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article