रुग्णालये हाऊसफुल! खोकल्याच्या रुग्णांमध्ये दहा दिवसांत दुपटीने वाढ, हवामानात अचानक बदल झाल्याने साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले
1 hour ago
2
नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या दहा दिवसांत तापमान कमालीचे घसरल्याने त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांत निच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. अचानक हवामान बदल झाल्याने साथीचे आजार वाढले आहे. घरोघरी सर्दी, खोकला अन् दम्याचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी कक्षात (ओपीडी) महिनाभरापूर्वी दैनंदिन १६० ते १८० रुग्ण तपासणीसाठी येत. मात्र, गेल्या १० दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने दोन सत्रातील ओपीडी २८० रुग्णांवर गेली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण हे सर्दी व खोकल्याचे आहेत. विशेष म्हणजे दैनंदिन १२५ ते १५० रुग्णांना सर्दी, खोकला, दम्याचा आजार आहे. ऑक्टोबर महिन्यात कडक ऊन व काही प्रमाणात पावसामुळे संसर्गजन्य आजार कमी झाले होते. मात्र, चिकनगुनिया, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही सरकारी रुग्णालयातील ओपीडी कमी झाली होती. मात्र, महिनाअखेरीस दहा दिवसांत सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी कक्षात रुग्णांच्या गर्दीने भरून जात आहे. प्रामुख्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे सर्दी खोकल्याचे आहेत. डॉ. अरुण सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय Q: खोकल्याच्या रुग्णात वाढ कशी ? A:थंडीच्या कालावधीत रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्याने याच कालावधीत सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढतात. Q: काय उपाययोजना करावी ? A:थंडीच्या कालावधीत शक्यतो आजारी रुग्णांनी सकाळी लवकर न उठता उशिरा उठावे. गरम उबदार कपड्यांचा वापर करावा. Q: खोकल्याचा काय परिणाम होतो? A:खोकल्यामुळे छातीत कफ साचला जातो. शिवाय सर्दीमुळे कान दुखीचे त्रास होतात. Q:रुग्णांनी कुठला आहार घ्यावा ? A:सर्दी, खोकल्यावर वेळेत उपचार न केल्यास निमोनिया सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेण्याबरोबरच पचनासाठी जड आहार न घेता हलका आहार घ्यावा. ^ सध्या वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे व गारव्याबरोबरच थंडीतदेखील वाढ झाल्यामुळे सर्दी खोकल्याबरोबरच कफ, डायरियाच्या रुग्णांत गेल्या दहा दिवसात मोठी वाढ झाली आहे. शक्यतो या कालावधीत सर्दी खोकल्याच्या रुग्णांनी कोमट पाणी घ्यावे, जेणेकरून घशाला सूज येणार नाही. कडधान्य आहारात घ्यावेत. सध्या तुरळक प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. - डॉ. नितीन झावरे, जनरल फिजिशीयन
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)