गुलाबराव पाटील
Published on
:
22 Jan 2025, 2:15 pm
Updated on
:
22 Jan 2025, 2:15 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणीतरी रेल्वेची चेन ओढल्यामुळे रेल्वेमध्ये आग लागल्याचा प्रवाशांचा समज झाला. व पुष्पक एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना धडक दिली. ही दुर्दैवी घटना हेलावून टाकणारी असून जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जळगाव रेल्वे दुर्घटनेनंतर त्यांनी बुधवारी (दि.२२) माध्यमांशी संवाद साधला.