जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे कुणी तरी चैन ओढली. परिणामी गाडी फास्ट थांबली आणि चाकातून ठिणग्या उडाल्या. त्यामुळे आग लागल्याचं कन्फर्म झालं. त्यामुळे जनरल डब्यातील काही लोकांनी एका साईडला तर काहींनी दुसऱ्या साईडला उडी मारली. दुसऱ्या साईडने जे उतरले ते कर्नाटक एक्सप्रेसने उडवले. कर्नाटक एक्सप्रेस १३० ते १४० च्या स्पीडने येत होती. मी स्टेशन मास्तरला विचारलं, तर त्याने एक्सप्रेसचा वेग ताशी १३० ते १४० इतका असतो असं सांगितलं. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाला. आणि ११ लोकांचा मृत्यू झाला. चौघांचे मृतदेह पाचोऱ्यात आहेत. तर ७ मृतदेह जळगावला पाठवले आहेत. कलेक्टर, एसपी आणि सर्व अधिकारी तिथे उपस्थित आहेत. मेडिकलचे सर्व अधिकारी तिथे उपस्थित आहेत.
चार लोकं गंभीर जखमी आहे. त्यांचं काय होईल हे सांगता येत नाही. वृंदावन नावाचं खासगी हॉस्पिटल आहे, तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. गैरसमजुतीतून ही दुर्घटना झाली आहे. पण दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. याची चौकशी होईल. पण केंद्र सरकारने मदत करावी ही विनंती करणार आहे. रक्षा खडसे यांनाही कळवलं की केंद्रतून मदत घ्यावी. वाहतूक क्लिअर झाली आहे. गाडी पाचोरा स्टेशनला आली आहे.
मी दोन मिनिटापूर्वी कलेक्टरशी बोललो. सर्व क्लिअर झालं आहे. घटनास्थळी काहीच राहिलेलं नाही. आग लागलीच नव्हती. फक्त अफवा होती. चैन ओढल्यानं चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यामुळे आग लागल्याचं सर्वांनाच वाटलं. चार जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकाड 15 वर जाऊ शकतो. यात तरी राजकारण करू नका. जा लोकांचा मृत्यू झाला त्यांचा विचार करा. हा घातपात नाही अपघातच आहे. कलेक्टरचं म्हणणं आहे की गाडी सरळ जात होती. घातपाताचा विषय नाही. जनरल डब्यातील लोकं उतरले. एसी डब्यातील लोकं उतरले नाहीत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हलटं आहे.