Lucky Ali connected 4th Marriage: झगमगत्या विश्वात लग्न, घटस्फोट फार सामान्य झालं आहे. अनेक सेलिब्रिटींनी चाळीशीनंतर घटस्फोट घेत, पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक लकी अली यांनी वयाच्या 66 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लकी अली यांनी नुकताच सुंदर नर्सरी, दिल्ली येथे आयोजित 18 व्या कथाकार आंतरराष्ट्रीय कथाकार महोत्सवात उपस्थित होते. याच ठिकाणी चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याची आता तुफान चर्चा रंगली आहे.
यावेळी लकी अली यांनी केवळ आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले नाही तर, त्यांच्या काही हिट गाण्यांमागील मनोरंजक कथा देखील सांगितल्या. दरम्यान, जेव्हा लकी अली यांना त्यांच्या पुढील स्वप्नाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
लकी अली म्हणाले, ‘पुन्हा विवाहबंधनात अडकावं असं माझं स्वप्न आहे…’, असं वक्तव्य लकी अली यांनी केलं. आता सर्वत्र फक्त आणि फक्त लकी अली यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. लकी अली यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तीनवेळा लकी अली विवाहबंधनात अडकले. पण तिन्ही पत्नींसोबत त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
लकी अली यांचं पहिलं लग्न
लकी अली यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1996 मध्ये लकी अली यांनी मेगन जेन मेकलरी यांच्यासोबत लग्न केलं. मेगन या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या होत्या. दोघांची पहिली ओळख ‘सुनो’ या अल्बम दरम्यान झाली होती. पहिल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लकी अली यांचं दुसरं लग्न
पहिल्या घटस्फोटानंतर लकी अली यांनी 2000 मध्ये अनाहिता नावाच्या पारशी महिलेशी दुसरे लग्न केलं. लकी अलीसोबतच्या लग्नासाठी अनाहिताने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून इनाया ठेवल. या लग्नापासून लकी अली यांना दोन मुलेही झाली.
लकी अली यांचं तिसरं लग्न
दुसऱ्या घटस्फोटानंतर लकी अली यांनी 2010 मध्ये केट एलिझाबेथ हलमशी लग्न केलं, परंतु 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लकी अलीसोबत लग्न केल्यानंतर तिने तिचे नाव बदलून आयशा अली ठेवलं. लकी अली यांची तिसरी पत्नी त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान होती. त्यांना एक मुलगाही आहे.