Delhi Elections Result:- दिल्लीत आज आठव्या विधानसभेचे निकाल (Assembly results) जाहीर होत आहेत. सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे.
एक्झिट पोलच्या सर्वेक्षणात, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला फक्त एक किंवा दोन जागा मिळाल्या होत्या, परंतु आता ते 70 जागांवर एकट्याने लढले आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शून्यावर घसरलेल्या काँग्रेसनेही यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत (Elections)उतरली. ही लढत तिरंगी नसली तरी काँग्रेसच्या जोरदार प्रचारामुळे निश्चितच रंजक होती.