प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
:
08 Feb 2025, 8:30 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:30 am
बोईसर: पुढारी वृत्तसेवा : बोईसर पोलिसांनी मोठी कारवाई करत काटकर पाडा परिसरात छापा टाकून तब्बल 2 कोटी 42 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेतले असून तो आपल्या राहत्या घरीच एमडी ड्रग्ज तयार करत होता. (Palghar Crime News)
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी पदवीधर असून त्याने या घातक पदार्थाची निर्मिती आपल्या घरातच सुरू केली होती. बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी ड्रग्जसह इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Palghar Crime News)