मित्राकडूनच विश्वासघात; 22 लाखांसह कार देण्यास नकारfile photo
Published on
:
08 Feb 2025, 8:46 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:46 am
नगर: पैशाची गरज आहे असे सांगून व्यावसायिक असलेल्या मित्राकडून 22 लाख रुपये उसने घेतले इतकेच नाही तर त्याचा विश्वास संपादन करीत बाहेरगावी जाण्यासाठी कार नेली. मात्र त्यांनतर त्याने कार व पैसे परत न केल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. स्वप्नील खाडे (रा. भिस्तबाग चौक, अ.नगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत कृतार्थ गुणवरे (वय 19, रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, कृतार्थ गुणवरे याचा मित्र स्वप्नील खाडे (रा. भिस्तबाग चौक, अ.नगर) याने पैशाची गरज आहे, असे सांगून जुलै 2024 पासून ते 20 जानेवारी 2025 दरम्यान कृतार्थकडून आणि त्याच्या आजोबांच्या अकाउंटवरून ऑनलाईन असे हात उसने 22 लाख रुपये घेतले.
22 जानेवारी रोजी स्वप्निल याने मला बाहेरगावी जाऊन पैसे घेऊन यायचे आहे. त्याकरिता तुझी कार दे, दोन दिवसाने परत आलो की तुझे घेतलेले 22 लाख रुपये व कार परत देतो असे सांगून विश्वास संपादन करून कार घेऊन गेला. त्यानंतर तो अद्याप परतला नाही.
त्यानंतर 28 जानेवारी रोजी कृतार्थ हा त्याच्या मित्रांसह स्वप्निल खाडे यांच्या घरी कार व पैसे मागण्या करता गेला असता स्वप्नील खाडे याने त्यांना शिवीगाळ करून कार परत मागण्या करिता आल्यास हात पाय तोडणार अशी धमकी दिली. याबद्दल त्याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अद्यापही राहुल खाडे याने पैसे व कार माघारी न दिल्याने स्वप्निल खाडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.