Naga Chaitanya connected Divorce: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न केलं आहे. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. घटस्फोटानंतर नागा चैतन्य म्हणाला, मी आणि समंथा आमच्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. पण आजही आम्ही एकमेकांचा सन्मान करतो… सांगायचं झाल तर, पहिल्यांदा अभिनेत्याने समंथासोबत झालेल्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत नागा चैतन्य म्हणाला, ‘आम्हाला आमाच्या मार्गाने प्रवास करायचा होता. स्वतःची काही कारणं असल्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आजही आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. मला कळत नाही की, आणखी कोणत्या स्पष्टीकरणाची गरज आहे. याबाबतीत कृपया आम्हाला प्रायव्हसी द्या… आमचा घटस्फोट आता चर्चेत विषय होतोय.’
पुढे नागा चैतन्य म्हणाला, ‘मी प्रचंड सभ्यतेने पुढील प्रवास सुरु केला आहे. ती (समंथा) देखील आयुष्यात पुढे जात आहे. आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत. मला पुन्हा माझं प्रेम मिळालं. मी प्रचंड आनंदी आहे. माझ्यासोबत देखील काही गोष्टी घडल्या, असं असताना मला दोषी का ठरवलं जातंय?’
‘जो काही निर्णय घेतला, तो आम्ही दोघांना फार विचार करुन घेतला आहे. माझ्यासाठी हा प्रचंड संवेदनशील विषय आहे. एका विभक्त झालेल्या कुटुंबातील मी आहे. त्यामुळे हा अनुभव काय आहे मला माहिती आहे. कोणतंही नातं तोडण्याआधी मी 1000 वेळा विचार करेल आणि आम्ही घेतलेला निर्णय आमचा खासगी निर्णय होता…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
समंथा आणि नाग चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केला होता.