शिंदे गट काय आहे, ते बोगस, ड्युप्लीकेट आहे. जेव्हा अमित शाह नसतील तेव्हा शिंदही नसतील असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.
शिंदे गट काय आहे, ते बोगस, ड्युप्लीकेट आहे. जेव्हा अमित शाह नसतील तेव्हा शिंदही नसतील असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. अमित शाह नसतील तेव्हा काय करतील. अमृत पिऊन आले का. गंगेत स्नान केलं म्हणजे कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. कधी ना कधी जातीलच ना, अशा शब्दांत संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला. आमचा पक्ष मजबूत आहे, आमचे खासदार असोत किंवा आमदार ते आमच्यासोबत आहेत, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे. तिथे त्यांना रात्रीच जावं लागतं. दिवसा कुणी भेटत नाही. हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी नेते. दिल्लीत फिरत असतात, अशी टीका त्यांनी केली.
Published on: Feb 08, 2025 11:36 AM