विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य लाभलेल्या अलिबागच्या सर्वांगीण विकासाकडे ट्रिपल इंजिन सरकारने सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वरसोली रो-रो जेट्टी, आक्षी मच्छीमार बंदराचा विकास, जिल्हा रुग्णालय नूतन इमारत, रेवस करंजा सागरी पूल हे महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. केवळ योजनांचा पाऊस पाडण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली. आमदार, खासदार, मंत्र्यांच्या बोलघेवडेपणामुळे निधीचा दुष्काळ पडल्याने अलिबाग विकासाच्या योजना ‘भकास’ ठरल्या आहेत.
अलिबाग तालुक्यात हजारो कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय तसेच शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी टाळ्या घेणाऱ्या फडणवीस सरकारने निधीची फुटकी कवडीही दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःच्याच घोषणांचा विसर पडल्याने
वरसोली रो-रो जेट्टी बारगळली
वरसोली येथे रो-रो जेट्टी, पोच रस्ता, गाळ काढणे, दगडी बंधाऱ्याची दुरुस्ती यासाठी 109 कोटी 22 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास वर्षभरापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. जिल्हा प्रशासनाकडे निधीच वर्ग न केल्याने हे काम रखडले आहे.
आक्षी साखर मच्छीमार बंदर गाळात
आक्षी साखर मच्छीमारी बंदराच्या विकासासाठी 159 कोटी 91 लाखांचा निधी शासनाने मंजूर केला. या निधीतून आक्षी साखर येथे ग्रोयन्स बंधारा, जेट्टी, पोहच रस्ता, खाडीतील नौकानयन भागातील गाळ काढण्याची कामे होणार होती. मात्र शासनाची घोषणा फक्त कागदावर राहिली आहे.
रेवस करंजा पूल कागदावरच
रेवस करंजादरम्यान खाडी पूल, रो-रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. रेवस करंजा पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 2 हजार 963 रुपयांचा ठेका ‘अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला देण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत पूल उभारण्याच्या कामाला सुरुवात नाही.
रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर
अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय अद्ययावत होणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक साधनांचा अभाव असल्याने उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड इमारतीत 300 बेडसह 20 बेडचा वेगळा आयसीयू कक्ष असणार आहे. 16 बेडचे नवजात बालकक्ष, 20 बेडचे डायलिसिस सेंटर, रुग्ण थांबा कक्ष, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्षही उभारले जाणार आहेत. मात्र हे सर्व कागदावर असल्याने रुग्णसेवा व्हेंटिलेटरवर आहे.
जिल्हा रुग्णालयाला इमारतीची प्रतीक्षा
अलिबाग जिल्हा रुग्णालय इमारतीची दुरवस्था झाल्याने नवीन सात मजली इमारत उभारण्यात येणार आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 150 कोटी 68 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यताही दिली. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही शून्य आहे