Naga Sadhu Election: महाकुंभातील अमृत स्नान संपल्यानंतर हळहळू सर्व आखाड्यांचे नागा साधू महाकुंभातून परत जावू लागले आहे. महाकुंभातून जाण्यापूर्वी नागा साधूंची निवडणूक झाली. आखाड्यातील सर्वोच्च पद म्हटले जाणारे पंच परमेश्वरची निवडणूक करण्यात आली. महाकुंभातून जाण्यापूर्वी ही निवडणूक करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे पालन करत प्रयागराज महाकुंभात सर्वात आधी आखाड्यांनी आपल्या नवीन सरकारचे गठण केले. त्यानंतर नागा साधू महाकुंभातून प्रस्थान करतात.
श्री पंचायती अखाडा महानिर्वाणीचे सचिव महंत यमुना पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाड्यातील सर्वोच्च पद असलेले पंच परमेश्वरची निवडणूक महाकुंभातून जाण्यापूर्वी करण्याची परंपरा आहे. धर्म ध्वजाच्या साक्षीने त्यासाठी 16 सदस्यांची महानिर्वाणीची निवडणूक झाली. त्यानंतर पंच परमेश्वर निवडण्यात आले. या पद्धतीने निरंजनी अखाड्याची निवडणूक झाली.
नागा संन्यासींचे शिबिरात प्रवेश करता येत नाही
नागा साधू महाकुंभातून जाण्यापूर्वी विविध परंपरेचे पालन करतात. शेवटची परंपरा भाला देवता प्रस्थान यात्र आहे. यामध्ये आखाड्यातील तीन नागा संन्यासी नागा वेशभूषेत भाले देवतांना पाठीवर ठेवतात. त्यानंतर ही पालखी घेऊन कुंभ परिसरात संतांच्या मिरवणुकीच्या रूपात कुंभ शिबिरातून निघून आपापल्या ठिकाणी जातात. मात्र या मिरवणुकीतही नागा साधू कुठेच दिसत नाहीत. नागा संन्यासींचे शिबीर पडद्याने झाकलेल्या असतात. त्याठिकाणी प्रत्येकाला प्रवेश नसतो. येथे नागा संन्यासी कुंभातून निघण्यापूर्वी शेवटची पूजा करतात.
हे सुद्धा वाचा
श्रृंगार करण्याची परंपरा
महाकुंभातून जाण्यापूर्वी नागा साधू त्यांचा शेवटचा श्रृंगार त्याच रात्री करतात. त्याच दिवशी आखाड्यातील देवता धार्मिक ध्वजाच्या दोर सैल त्या ठिकाणावरुन निघून जातात. श्री पंच दशनम जुना आखाड्यातील नागा संतांच्या अनुष्ठानाचे सह-प्रभारी स्वामी चैतन्य प्रकाश गिरी सांगतात की, आखाड्यातील इष्ट देवतेचा निरोप घेतल्यानंतर महाकुंभ परिसरात शिबिरात पुन्हा एकदा नागा साधू श्रृंगार करतात. हा श्रृगांर महाकुंभात येताना जसा केलेला असतो तसाच असतो.
महाकुंभातून नागा साधू काशीला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट काशीतील आखाड्याच्या नियुक्त ठिकाणीच नागा संन्यासी भेटतात. त्या ठिकाणी शेवटचे स्नान करतात. यानंतर नागा तपस्वी अज्ञात स्थळी रवाना होतात.