अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानंतर आता चर्चा होतेय ती अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची. रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेश महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखनेच सांभाळली आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा मराठी चित्रपट ‘वेड’ हा सुपरहिट ठरला. प्रेक्षकांच्या अक्षरश: या चित्रपटाला उचलून घेतलं. या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहे. या चित्रपटाबाबत अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातं आहे.
चित्रपटातील रितेश देशमुखचा लूक समोर
अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याच्या विरुद्ध भूमिकेत साइन केलं आहे. दरम्यान चित्रपटाचे शुटींग जोरदार सुरु असून रितेशचा एक लूकचा फोटोही समोर आला आहे. हा फोटो शुटींगदरम्यानचा असून रितेश महाराजांच्या वेशात दिसत आहे.
हे अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका
चित्रपटात अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली असून ते या चित्रपटात निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहेत. एका रिपोर्टनुसार, हे तिनही अभिनेते मुघलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा केली होती.
राजा शिवाजी चित्रपटाचं शुटिंग जोरात सुरु
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ प्रक्षकांना आता रितेशच्या या चित्रपटाच्या ट्रेलरलची आणि रिलीज डेटची उत्सुकता लागून राहिली आहे.