सूरज बडजात्या यांनी 'दीदी तेरा देवर दिवाना' गाण्यातील मजेशीर किस्सा सांगितला Instagram
Published on
:
08 Feb 2025, 6:05 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:05 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - 'बडा नाम करेंगे' ७ फेब्रुवारीपासून सोनी लिव्हवर पाहायला मिळत आहे. अलीकडेच सूरज आर. बडजात्यांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली. सूरज बडजात्या यांनी यावेळी बडा नाम करेंगेच्या माध्यमातून ओटीटी पदार्पण करणार असल्याचे सांगितले. राजश्री प्रोडक्शन्सचा सर्वात हिट चित्रपट हम आपके है कौन...!च्या चित्रिकरणावेळी पडद्यामागे घडलेला एक विलक्षण प्रसंग यावेळी त्यांनी सांगितला. या प्रसंगात कसे माधुरी दिक्षितने सलमान खानचे आयकॉनिक गाणे 'दीदी तेरा देवर दिवाना'च्या नाईटीतल्या शूटिंगसाठी तयारी केली, याबबतचा हा मजेशीर किस्सा!
स्पर्धक रितिकाने या गाण्याचे बहारदार सादरीकरण केल्यानंतर सूरज बडजात्या सगळ्यांना आठवणी सांगू लागले. ते म्हणाले, “हे एक खूपच लांबलचक आणि तपशीलवार गाणं होतं. त्याच्या तालमी १६ दिवस चालल्या आणि चित्रिकरणाला ९ दिवस लागले. आम्हाला हे गाणं मौजमजेच्या आणि विजयसोहळ्याच्या साथीने एका उंचीवर नेऊन संपवायचं होते. या सीनसाठी सलमानने नाईटी घालावी, असं मी माझ्या वडिलांना सुचवलं. सलमानने या प्रस्तावावर ताबडतोब मान डोलावली, पण माझ्या वडिलांनी ही कल्पना फेटाळली. त्यांना ते गाण्याला साजेसं वाटत नव्हतं. पण संपूर्ण टीम इतकी उत्साही होती की, आम्ही यावर सेटवरच्या महिलांची मतं घ्यावीत असं ठरवलं. माधुरी दीक्षितसह सगळ्या डान्सर्सना ही कल्पना प्रचंड विनोदी वाटली आणि हे करायलाच हवं असं त्यांनी सांगितलं. शेवटी, स्वत: माधुरीने या सीनसाठी सलमानचा मेकअप केला.
त्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल सूरज बडजात्या यांनी धन्यवाद मानले.
गुल्लकमुळे नावाजले गेलेले दिग्दर्शक पलाश वासवानी आणि खुद्द सूरज आर. बडजात्या या मालिकेचे शो रनर आहे व यात हृतिक घनशानी, आयेशा कडुसकर, कंवलजीत सिंग, अल्का अमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, दीपिका अमीन, जमील खान, राजेश तेलंग, अंजना सुखानी, साधिका सयाल, ग्यानेंद्र त्रिपाठी, प्रियंवदा कांत, ओम दुबे, भावेश बाबानी व अशा कितीतरी कलाकारांचा समावेश आहे.
८ व ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता सोनी एंटरटेनमेन्ट टेलिव्हिजनवर इंडियन आयडॉलचा हा भाग पाहा.