विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अकोट येथे निवडणूक यंत्रणेने विविध उपक्रम राबवले. निवडणूक विभागाने एक लिंक तयार केली आहे. मतदारांनी या लिंकवर स्वतःचे नाव भरून मतदानाची शपथ घ्यायची आहे. ही शपथ घेतल्यावर त्याला एक ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. आतापर्यंत सुमारे ३५ हजार मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेऊन प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी सोमवारी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. या उपक्रमांना मतदारांनी प्रतिसादही दिला आहे. ८५ पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सोय त्याचाच एक भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आली होती. या गृहमतदानाही उत्तम प्रतिसाद लाभल्याचे लोणारकर म्हणाले. मतदारांना मध्ये जागृती करण्यासाठी सोमवारी शासकिय कर्मचारी वर्गाची दुचाकी फेरी काढण्यात आली होती. त्या शिवाय पथनाट्यही विविध ठिकाणी घेण्यात आले. आमिषाला बळी पडू नये मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावत असतांना आमिषाला बळी पडू नये. सरकारी यंत्रणा चौकसपणे सर्वत्र लक्ष ठेऊन आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रामाणिकपणे सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे. यादीत नाव नाही, मतदान नाही मतदान केंद्रावरील मतदार यादीत ज्या मतदाराचे नाव नाही, नावापुढे डिलिटेड असा शिक्का असेल त्याला मतदान करता येणार नाही. या संदर्भात समाज माध्यमातून दिशाभूल करणारा मेसेज फिरत आहे, त्यावर भरवसा ठेऊन यंत्रणेशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई ला सामोरे जावे लागेल, असा इशारा लोणारकर यांनी दिला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)