लेहमध्ये कार्यरत नांदेडच्या‎ जवानाला अतिथंडीने वीरमरण‎:आज गावी हिरानगर तांडा येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार‎

3 hours ago 1
लेहमधील सियाचीन ग्लेशियर भागात‎कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील ‎‎‎जवानाचा अतिथंडीमुळे‎‎प्रकृती बिघडल्याने मृत्यू‎‎झाला. सुधाकर शंकर‎‎राठोड (४०) असे जवानाचे‎‎नाव आहे. ते मुखेड‎‎तालुक्यातील हिरानगर तांडा‎येथील रहिवासी होते. आज २७ रोजी त्यांचे‎पार्थिव गावी आणले जाईल. त्यानंतर शासकीय‎इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.‎ सुधाकर राठोड हे १२७ एलटी एडी रेजिमेंट‎या बटालियनमध्ये हवालदार पदावर कार्यरत‎होते. ते २००६ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती‎झाले होते. ते सध्या लेहमधील सियाचीन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎भागात बर्फाळ प्रदेशात कार्यरत होते. मेंदूला‎ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागल्याने त्यांची‎प्रकृती बिघडली. लष्कराने त्यांना चंदीगड‎येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल‎केले होते. मात्र, उपचार सुरू असताना‎सोमवारी सकाळी, ७ वाजेच्या सुमारास त्यांची‎प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव चंदीगड‎येथून विमानाने हैदराबादेत व नंतर‎रुग्णवाहिकेने आज हिरानगर (ता. मुखेड)‎येथे आणले जाणार आहे. सकाळी १० वाजता‎शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.‎ पुढील वर्षी घेणार होते निवृत्ती‎ जवान सुधाकर राठोड यांची १९ वर्षे ४ महिने‎देशसेवा झाली होती. पुढच्या वर्षी त्यांना‎सेवानिवृत्ती घ्यायची होती. मात्र निवृत्तीच्या‎काही महिन्यांपूर्वीच ही घटना घडली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article