लोकशाही भवनला तिहेरी सुरक्षा; 150 जवानांचा वॉच:आणखी चोवीस तास स्ट्राँगरूमचे रक्षण; अमरावती, बडनेरा मतदारसंघाची होणार मतमोजणी

6 hours ago 1
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अमरावती व बडनेरा मतदारसंघातील सीलबंद ईव्हीएम विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनमध्ये ठेवण्यात आले. येथेच बडनेरा व अमरावती मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. दरम्यान या ठिकाणी स्ट्राँगरूमला पोलिसांनी कडक सुरक्षा दिली आहे. या ठिकाणी थ्री लेअरमध्ये केंद्रीय, राज्य आणि स्थानिक पोलिस असे एकूण १५० जवान २४ तास सुरक्षेसाठी तैनात आहेत. या दोन्ही मतदान केंद्राचे सीलबंद ईव्हीएम गुरुवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेपर्यंत लोकशाही भवनमध्ये पोहोचले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी स्ट्राँगरूमवर ईव्हीएमच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी बीएसएफ जवानांकडे सोपवली आहे. या पहिल्या सुरक्षा कवचासाठी ६० बीएसएफ जवान, दुसऱ्या कडेवर एसआरपीएफचे ६० जवान तर बाह्य सुरक्षेची जबाबदारी स्थानिक शहर पोलिस सांभाळत असून त्यांचे ३० अधिकारी, अंमलदार आहेत. असे एकूण १५० जवान ईव्हीएमची चोख सुरक्षा सांभाळत आहेत. या सुरक्षेव्यतिरीक्त निवडणूक विभागाकडून संपूर्ण लोकशाही भवन परिसरात सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहेत. तसेच २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मत मोजणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लोकशाही भवन येथे होणाऱ्या मतमोजणीनिमित्त सुरक्षेचा आढावा घेताना अधिकारी. ‘बीपीएड’ कॉलेजवर गर्दी बडनेरा मतदारसंघातील मतदान पथकांना ईव्हीएम व इतर निवडणूक साहित्याचे वाटप पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून करण्यात आले. तसेच मतदान संपल्यानंतर ईव्हीएमसह साहित्याचे संकलन त्याच ठिकाणी करण्यात आले. दरम्यान बुधवारी सायंकाळपासून मतदान पथक साहित्य व ईव्हीएम घेऊन त्या ठिकाणी येत होते. त्यामुळे गुरुवारी पहाटेपर्यंत काही ठिकाणावरील साहित्य पोहोचत असल्याने उशिरा रात्रीपर्यंत गर्दी होती. तसेच अमरावती मतदारसंघासाठी लोकशाही भवनमध्ये पहाटे ५ वाजेपर्यंत मतदान पथकांची ये जा सुरू होती. मतमोजणीनिमित्त चोख सुरक्षा ठेवण्यात आली ^लोकशाही भवनमध्ये अमरावती व बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी तिहेरी सुरक्षा ठेवण्यात आली. तसेच मतमोजणीच्या दिवशी लोकशाही भवनसमोर व आतमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. -नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article