लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचा हक्क बजावावा:चित्रकला स्पर्धेवेळी उज्वला पांगरकरांचे आवाहन

1 day ago 1
प्रशासनाच्या वतीने अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघात स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती होत आहे.दि.१६ रोजी यशवंत विद्यालय अहमदपूर येथे स्वीप पथकाद्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर यांनी उपस्थितीत विद्यालयातील शिक्षक बांधवांना संविधानाने दिलेले मतदानाचा अधिकार येणाऱ्या २० नोव्हेंबर सर्वांनी बजवावा.बाल कलाकारांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना मतदानाची आठवण करुन देऊन कर्तव्य बजावण्यासाठी सांगून आपणही या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावे, असे आवाहन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी राष्ट्रीय लोकउत्सावात सर्व मतदार बंधु-भगिणींनी मतदानाचा हक्क बजाऊन आपले हक्काचे सरकार स्थापन करावे.विद्यार्थ्यांन ी चित्रकलेतून जनजागृती केलीच आहे. तरीपण २० नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी बुधवार पाठवून द्यावेत.शेजारी, नातेवाईक,मित्रबांधव यांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन हे कर्तव्य पार पाडण्यासाठी ,राष्ट्रीय कार्यात सर्वांनी हातभार लावावा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article