लोहारा शाळेत बालदिनी झाला विद्यार्थ्यांचा सन्मान:लोहारा येथे डॉ. पंडित विद्यालयात कार्यक्रम‎

2 hours ago 1
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचालित डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक लोहारा येथे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक जे.आर. निकम होते. यावेळेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु.डी. शेळके, उपमुख्याध्यापक एस.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक पी.एम. सुर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील प्रातिनिधीक स्वरूपामध्ये एक विद्यार्थी व विद्यर्थिनीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापिका यु.डी. शेळके यांनी केले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सामाजिक कार्याविषयीची माहिती दिली. नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. शिक्षकांमधून आर.के. सुरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक बी.एन. पाटील यांनी व आभार वाय.पी. वानखेडे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणं करत देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षकांनीही त्यांच्या कार्याची माहिती दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article