बार्शी : सुकाता परिसरात रात्री एकाने गाडीतून मोबाईल मध्ये टिपलेला वाघ.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 1:03 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:03 am
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासह लगतच्या धाराशिव जिल्ह्यात गत दोन महिन्यापासून धुमाकूळ घालून असंख्य पाळीव प्राण्यांचा बळी घेणार्या त्या वन्य प्राण्यांचे व बिबट्याचे बार्शी तालुक्यात हल्ले सुरूच असून तालुक्यांतील धस पिंपळगाव शिवारात बिबट्याने तीन शेतकर्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ले करत दोन रेड्यांचा बळी घेतला तर एक गाईचे वासरू गंभीर जखमी झाले. वाघ धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सुकटा परिसरात वनविभागाच्या ट्रॅप कॅमेर्यात कैद झाला.
धस पिंपळगाव शिवारातील समाधान मुळे व उत्तरेश्वर धस या दोन शेतकर्यांच्या बांधलेल्या मशीनच्या दोन रेड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला करत रेड्यांचा फडशा पाडला. तर याच शिवारात रामेश्वर धस यांच्या गायीच्या वासरावर त्या बिबट्या सदृश्य प्राण्याने जीवघेणा हल्ला करत वासराला गंभीर जखमी केले आहे. बार्शी तालुक्यात स्थायिक झालेल्या त्या वाघाने धाराशिव जिल्ह्यातील सुकटा (भूम) शिवारात आपला मोर्चा वळवला असून त्या भागात राम गंगा व बानगंगा या बारमाही पाणी साठा राहणार्या त्या दोन साठवण तलावाच्या दरम्यान तो स्थिरावला आहे.
बुधवारी रात्री भूम तालुक्यातील सुकटा शिवारात एकाने मोबाईलमध्ये टिपले आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर त्या वाघाने भूम तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात शेतकर्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. वाघाचा शोध घेण्यासाठी अधिकार्यांनी संबंधित शोध पथकाला सूचना दिलेल्या आहेत. बुधवारी पांगरी शिवारालगत असलेल्या पांढरी येथील शेतकर्याला वाघाने दर्शन दिल्याची वार्ता आहे.