वर्क फ्रॉम होमचे आमिष पडले महागात:तरुणीला बसला 22 लाखांचा गंडा

2 hours ago 1
घरून काम करण्याच्या आमिषाद्वारे सायबर चोरट्यांनी तरूणीला तब्बल २२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी कालावधीत लोणीकंद परिसरातील पेरणेफाटा याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरूद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी पेरणे फाटा परिसरात राहायला आहे. ३१ जानेवारीला सायबर चोरट्यांनी तिला टेलीग्रामवर वर्क फ्रॉम होमचा मेसेज पाठविला. त्यानंतर तक्रारदार तरूणीने संबंधितांना अधिकची माहिती विचारली. त्यानुसार सायबर चोरट्यांनी सावज जाळ्यात अडकविण्यासाठी ऑनलाईन टास्कद्वारे रक्कम मिळणार असल्याचे सांगितले. त्याबदल्यात काही रक्कम तक्रारदार तरूणीला पाठविण्यात आली. त्यामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर तरूणीने प्रीपेड टास्कमध्ये जादा परतावा मिळण्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. २२ लाख ५० हजार रूपये जमा केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना ५८ हजार रूपये माघारी दिले. उर्वरित रक्कम न देता ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करीत आहेत. पोलिस चौकीजवळून महिलेचा मोबाईल हिसकावला चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून, त्यांची मजल आता थेट पोलिस चौकीजवळच लुटमार करण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पादचारी, महिला, जेष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा २५ हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना झाशीची राणी चौकात घडली आहे. याबाबत महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकातून पायी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेकडील २५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर पादचारी महिलेचा मोबाइल हिसकावल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे बालगंधर्व पोलिस चौकीजवळ अगदी १०० मीटर अंतरावरच मोबाइल चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article