वारी मार्गावर १३ वर्षांपासून स्वच्छता अभियान; ७० टक्के कचरा घटला:जागर फाउंडेशनचा पुढाकार; ३०० स्वयंसेवकांचा असतो सहभाग
4 hours ago
1
जागर फाउंडेशनकडून श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ४० कि.मी. अंतराच्या शेगाव वारी मार्गावर सुमारे १३ वर्षांपासून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. वारीत सहभागी होणाऱ्या भक्तांना विविध संघटना, व्यक्तींकडून अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ, पेयजलाचे वितरण करण्यात येते. वापरानंतर पत्रवाळी, प्लेट्स, ग्लास कुठेही फेकण्यात येतात. यातून मार्गावर प्रचंड कचरा जमा होतो. जागर फाउंडेशनकडून ३०० स्वयंसेवकांच्या माध्यमातून मार्गावर स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. परिणामी सुमारे ७० टक्के कचरा घटल्याचे निरीक्षण फाऊंडेशनकडून नोंदवण्यात आले. तसेच पर्यावरणाचे संवर्धनही होत आहे. सन २०१० मध्ये शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने सुमारे ६० शेळ्या दगावल्या होत्या. वारी मार्गावर फेकलेले प्रसादरूपी अन्न खाल्याने ही दुर्घटना घडली होती. हा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळी अन्नदाते व वारी यांच्यात ‘उष्टं टाकू नका', ‘प्रसादाचा मान राखा', असा संदेश देणारे जाणीव जागृती अभियान जागर फाउंडेशनकडून राबवण्यात येते. सर्वाधिक कचरा चहा व पाण्याचे ग्लास संकलित होतात. सन २०१३ पासून आम्ही हा उपक्रम राबवत असून, जनजागृतीमुळे या ७० टक्के कचरा घटल्याचे निरीक्षण फाउंडेशनचे इक्बाल हुसेन यांनी नोंदवले. यंदाही मोहिम राबवण्यात येणार आहे. यांचाही सहभाग स्वच्छता अभियानात प्रभात िकड्स स्कूलचे कर्मचारीही सहभागी होतात. तसेच बारा खोली येथे असलेल्या कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टकडून अभियान सहभागी स्वयंसेवकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)