Santosh Deshmukh Murder Case | वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे सोलापूरात कोट्यावधीची संपत्तीFile Photo
Published on
:
18 Jan 2025, 11:56 am
Updated on
:
18 Jan 2025, 11:56 am
सोलापूर: संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते.
वाल्मिक कराड यांच्या संदर्भात रोज नवीन खुलासे उघड होत आहेत. यापूर्वी ज्योती मंगल जाधव जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.
एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे.
वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगळ जाधव कोण आहेत, ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील… pic.twitter.com/uRy2VNQbPS
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 17, 2025