वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर शेती:सालगड्याला गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाही, मजुरांवर उपासमारीची वेळ

6 hours ago 1
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी तसेच मंत्री धनंजय देशमुख यांच्या जवळचा असणारा वाल्मीक कराडवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी व कारवाई सुरू आहे. वाल्मीक कराडची अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापूरमध्ये सुद्धा कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडच्या पहिल्या पत्नीच्या नावावर पुण्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे, तसेच त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर सोलापूर येथील बार्शी येथे जवळपास 35 एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या शेतात काम करणाऱ्या सालगड्याला गेल्या तीन महिन्यांपासून पगारच दिला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे समोर आले आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिंदे माने या कुटुंबाने गेल्या तीन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीकच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर जमीन आहे. याठिकाणी गेल्या 7 महिन्यांपासून माणिक शिंदे-माने यांचे कुटुंब सालगडी म्हणून काम पाहत आहे. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना पगारच दिला गेला नसल्याची माहिती सालगड्याने दिली आहे. पगार मिळत नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या संजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचे ट्विट केले होते. याची अंदाजे किंमत हीह सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे. दोन वर्षांच्या कालावधीत ही जमीन खरेदी करण्यात आली असल्याची माहिती देखील अंजली दमानिया यांनी दिली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article