वाळूंज येथे मोफत आरोग्य तपासणी व‎उपचार शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद‎:आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी

15 hours ago 1
अहिल्यानगर संविधान दिनानिमित्त वाळुंज (ता. नगर) येथील आरोग्य केंद्रात ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. मंगळवारी समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण कार्यक्रम अंतर्गत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच पार्वतीबाई हिंगे, उपसरपंच अलकाबाई दरेकर, सोसायटीचे चेअरमन मंदाताई दरेकर, ग्रामपंचायत सदस्या कविता गायकवाड, यांचा मार्गदर्शन खाली व सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, समाज परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, सुहास सोनवणे, मोहन शिरसाठ आदी उपस्थित होते. रावसाहेब काळे म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक आहे. गंभीर आजार झाल्यावर ग्रामस्थ औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. यासाठी आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी ठरत आहे. डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले, आरोग्य सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत आहे. वाळुंजला ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article