विद्यार्थ्यांनी सर्व व्यसनापासून दूर रहावे, व्यायाम करुन शरीर तंदुरूस्त ठेवावे:वैराग भागातील दोन शाळांमध्ये दिली योगाची प्रात्यक्षिके
1 hour ago
1
मुला-मुलींना सामाजिक, कौटुंबिक व शालेय जीवनातील त्यांची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी शालेय वयात अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यसनाधीनतेपासून दूर राहावे. याशिवाय कुटुंबातील सदस्य जर व्यसनाधीनतेकडे वळत असेल तर त्यांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करून शरीर तंदुरूस्त बनवले पाहिजे. व्यसनापासून दूर राहून नियमित व्यायाम केला तर आपण निरोगी राहू, असे प्रशिक्षक महेश वैद्य यांनी सांगितले. ते वैराग (ता. बार्शी)मधील शारदादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व विद्यानगर प्राथमिक शाळेत नशामुक्त भारत अभियानांतर्गत बोलत होते. महेंद्र नाईक निंबाळकर यांनी प्रस्तावना केले. प्रताप खेंदाड यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्राचार्य संतोष सरवळे, नेताजी घायतीडक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. आहाराची माहिती अन् योगाची प्रात्यक्षिके तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेण्याचा सल्ला दिला. आहारात पालेभाज्या अन् फळांचा समावेश अधिक असला पाहिजे, असा सल्ला वैद्य यांनी दिला. या वेळी वैद्य यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगा करण्यास सांगत प्रात्यक्षिके करून दाखवली. यातून विद्यार्थ्यांना सदृढ आरोग्य राखण्यासाठी मदत होणार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे यातून सांगण्यात आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)