Published on
:
24 Jan 2025, 1:11 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:11 am
पणजी : विधानसभेचे अधिवेशन 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होत आहे. अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी 24 रोजी दुपारी 4 वाजता होणार असल्याची माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली. या बैठकीमध्ये कामकाजाची निश्चिती होईल.
विधानसभा कालखंडातील तांत्रिक काळासाठी विधानसभेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होणार असून, ते 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होईल. हे अधिवेशन या वर्षातील पहिली अधिवेशन असल्याने गुरुवारी 6 फेब्रुवारीची पहिल्या दिवसाची सुरुवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर कोणतेही कामकाज होणार नाही. दुसर्या दिवशी शुक्रवार असल्याने खासगी कामकाजाचा दिवस असेल. आमदारांचे खासगी ठराव चर्चेला घेतले जातील. शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना तसेच खासगी ठराव किती घ्यायचे, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आमदार वेन्जी व्हिएगस हे कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत.