विनोद तावडेंनी फेटाळले पैसे वाटल्याचे आरोप:म्हणाले - मी 40 वर्षांपासून राजकारणात, कुणी काहीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही

2 days ago 2
विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर आणि राजन नाईक यांनी संयुक्त पद्धतीने नालासोपारा येथील हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हॉटेलमध्ये सापडलेले पैसे, पैशांचे बॅग तसेच विनोद तावडे यांच्याकडील 4 डायरी सापडले. त्यात कोणाला किती पैसे दिले आहेत याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच हे पैसे कोणाला वाटले असा सवाल देखील ठाकूर यांनी विनोद तावडे यांना विचारला होता. मात्र यावर काहीच प्रतिक्रिया न देता ही पत्रकार परिषद संपवण्यात आली. निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद संपवण्यासाठी सांगितले असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. विनोद तावडे यांच्याकडील डायरीमध्ये लाखोंच्या संख्येत प्रत्येकाला पैसे वाटल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी दाखवले. तसेच हॉटेलच्या एकाच खोलीतून जवळपास 9 लाख रुपये सापडले होते. विनोद तावडे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना घेरले होते. त्यानंतर हितेंद्र ठाकूर व क्षितिज ठाकूर यांनी हे पैसे कोणाला वाटले असा सवाल करत विनोद तावडे यांना घेरले होते. येथील उमेदवार राजन नाईक यांनी विनोद तावडे यांना मतदानाचा टक्का कसा वाढवला जाईल यासाठी बैठकीला बोलावले असल्याचे सांगितले आहे. मात्र हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडले असल्याने नेमका प्रकार काय आहे, याबद्दल अजूनही लोकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे. पत्रकार परिषदेत देखील विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले नाही. आता यावर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विनोद तावडे म्हणाले, या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मी येत असताना इथे बैठक सुरू होती की निवडणूक दिवशी काय असते त्यावर बोलणं सुरू होते. यावेळी सगळ्यांना भेटलो आणि निघणार होतो. तेवढ्यात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आले आणि त्यांना वाटले की पैसे वाटप सुरू आहे. निवडणूक आयोगाने माझी गाडी तपासली, माझी रूम तपासली आणि मी 40 वर्ष झालो राजकारणात आहे, मी कधी निवडणुकीत पैसे वाटलेच नाहीत, असे तावडे म्हणाले. कोणीही काही आरोप केले तरी मला काही फरक पडत नाही, असेही विनोद तावडे म्हणाले. हितेंद्र ठाकूर म्हणाले, निवडणूक आयोगावर प्रशासनाचा दबाव आहे. माझ्यावर कोणाचा दबाव नाही, मात्र निवडणूक आयोगावर प्रशासनाचा दबाव आहे हे निश्चित आहे. माझी इथे कसली दादागिरी नाही. जे पैसे सापडले ते काय माझे होते? 48 तासांआधी मतदारसंघातून जायचे असते, तरी ते थांबले कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article