विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन:उमेद महिला व कर्मचारी संघटना करणार आंदोलन

2 hours ago 1
खामगाव येथे गटविकास अधिकारी राजपूत यांना निवेदन देताना महिला. प्रतिनिधी|खामगाव उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी संघटना आक्रमक झाली . याबाबत शासनासोबत बैठका झाल्या असून या मागण्या पूर्ण करण्याचे शासनाने आश्वासन दिले . मात्र मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. ही मागणी पूर्ण न झाल्याने उमेद राज्य महिला व कर्मचारी संघटनेतर्फे तसेच अभियानातील महिला, केडर, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्या साठी न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन देताना महिला केडर तालुकाध्यक्ष दीपाली अडकणे, कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष अनिता सोळंके, स्वप्निल आराख, सचिव शारदा हटकर, मुक्ता टाळे, रिना मुळे, शिल्पा गिरी यांच्यासह प्रभाग संघ पदाधिकारी व संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article