वैभववाडीत परप्रांतीय ठेकेदारांना धक्काबुक्की!

3 hours ago 2

वैभववाडी ः सत्ताधारी नगरसेेवक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.pudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 1:10 am

Updated on

31 Jan 2025, 1:10 am

वैभववाडी ः वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या विकासकामांचा ठेका भरण्यासाठी आलेला एक परप्रांतीय ठेकेदार व अन्य एका ठेकेदाराला नगरपंचायतीमधील सत्ताधारी नगरसेवक व स्थानिक ठेकेदारांनी जोरदार धक्काबुक्की केली. त्यांच्या हातातील कागदपत्रांची फाईल हिसकावून घेतली. त्या ठेकेदाराची बाजू घेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी याठिकाणी दाखल झाल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना गुरुवारी दुपारी नगरपंचायत कार्यालयासमोर घडली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणाकडूनही वैभववाडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा एका परप्रांतीय ठेकेदाराने भरली होती. त्याला स्थानिक ठेकेदार व सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध होता. नगरपंचायतीच्यावतीने गुरुवारी निविदा उघडण्यात येणार होती. यासाठी सदर परप्रांतीय ठेकेदार हा तहसील कार्यालय वैभववाडी येथे शपथपत्र करण्यासाठी आला होता. याची खबर नगरपंचायतीतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक व काही ठेकेदारांना लागली. त्यांनी तहसील कार्यालयात जात त्या परप्रांतीय ठेकेदाराला निविदा भरण्यापासून अडवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला.

यावेळी या ठेकेदाराची बाजूने महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी व ठेकेदारांनी बाजू घेतली. कोणीही ठेका घेऊ शकतो. तुम्ही त्याला आडवू शकत नाही. अशी भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. याची माहिती मिळताच त्याठिकाणी वैभववाडी पोलिस दाखल झाले. पोलिस दाखल होतात सर्वजण बाजूला झाले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी हे नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. नगरपंचायत कार्यालयात त्यांची मोठी गर्दी जमली होती.

निविदा भरण्यासाठी जाताना गेटवर रोखले

सदर परप्रांतीय ठेकेदार व अन्य एक ठेकेदार निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात जात असताना त्यांना सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी यांनी नगरपंचायत कार्यालयाच्या गेटवरच रोखले. त्यांच्या हातातील कागदपत्रांची फाईल हिसकावून घेतली. त्यांना धक्काबुकी करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारीही या ठिकाणी जमा झाले. यावेळी दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची झाली. मागाहून आलेले सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी सर्वांना शांत करण्याचे काम केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article