शबरीमला दीक्षेचं पालन करताना दर्ग्यात गेल्याबद्दल रामचरण ट्रोल; पत्नीकडून सडेतोड उत्तर

2 hours ago 1

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रामचरण याने दोन अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट दिली. एकीकडे आंध्रप्रदेशमधील कडपा याठिकाणी श्री विजया दुर्गा देवी मंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतलं. तर दुसरीकडे तो अमीन पीर दर्ग्यातही प्रार्थनेसाठी गेला होता. रामचरणचे दर्ग्यातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एकीकडे त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. तर दुसरीकडे काहींनी त्यावरून टीकासुद्धा केली आहे. शबरीमला दीक्षेचं पालन करताना दर्ग्यात जाणं अयोग्य असल्याचं मत काहींनी नोंदवलंय. काहींनी रामचरणची पत्नी उपासनाच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही टीका केली. त्यावर आता उपासनाने पोस्ट लिहित ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

उपासनाने मंगळवारी एक्स अकाऊंटवर पतीचा फोटो पोस्ट केला. यामध्ये रामचरण शबरीमला दीक्षेचं पालन करताना परिधान केल्या जाणाऱ्या काळ्या कपड्यांमध्ये दिसला. त्याच कपड्यांमध्ये तो अमीन पीर दर्ग्यात पोहोचला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उपासनाने लिहिलंय, ‘विश्वास तुम्हाला जोडतो, कधीही विभाजित करत नाही. भारतीय म्हणून आम्ही परमात्म्याच्या सर्व मार्गांचा आदर करतो. आपली शक्ती एकात्मतेमध्ये आहे. रामचरण इतर धर्मांचा आदर करत स्वत:च्याही धर्माचं पालन करतोय.’ अनेकांनी उपासनाच्या या पोस्टचं कौतुक केलं. तर काहींनी त्यावरूनही प्रश्न उपस्थित केले. ‘एकमेकांच्या धर्माचा आदर करणे याचा अर्थ अय्यप्पा माळा गळ्यात घालून दर्ग्यात जाणं नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आपण त्यांच्या श्रद्धेचा अपमान न करता त्यांच्या धर्माचा आदर करू शकतो आणि आपल्या धर्मात ढवळाढवळ न करता ते जे करतात त्याचा आदर करू शकतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

#RamCharan visits Kadapa In Ayyapa Mala 🙏🙏

Dargah & Vijayadurgamma temple ❣️ pic.twitter.com/G53wSpEYbI

— Thyview (@Thyview) November 19, 2024

नेटकऱ्यांच्या या टीकेवर उत्तर देताना उपासनाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या फोटो गॅलरीची लिंक शेअर केली. त्यात असं लिहिलंय की, ‘एकोपा स्वीकारताना: वावरच्या मशिदीत प्रार्थना करण्याची शबरीमलाची अनोखी परंपरा.’ शबरीमलाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी यात्रेकरू हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या वावर इथल्या मशिदीमध्ये प्रार्थना करण्याविषयीचा हा लेख आहे. वावर जुमा मशीद केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एरुमेली इथं शबरीमला मंदिरापासून 45 किमी अंतरावर आहे.

Faith unites, ne'er divides As Indians, we grant each paths to the divine 🙏 our spot lies successful unity. 🇮🇳 #OneNationOneSpirit #jaihind @AlwaysRamCharan respecting different religions portion pursuing his ain 🫡 pic.twitter.com/BdW58IEEF9

— Upasana Konidela (@upasanakonidela) November 19, 2024

“हे मशीद भगवान अय्यपा यांचे प्रसिद्ध मुस्लिम सहकारी वावर यांना समर्पित आहे. वावर यांच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एका कथेत त्यांना अरब समुद्री डाकू म्हटलंय, तर दुसऱ्यात त्यांना मुस्लिम संत म्हटलंय. काहींनी त्यांना सीरियाहून आलेले परदेशी म्हटलंय तर काहींनी त्यांचा संबंध पांड्या राज्याशी जोडला आहे. वावर कोणीही असो, पण एक गोष्ट जी निर्विवाद आहे ती म्हणजे भगवान अयप्पा यांच्याशी असलेली त्यांची मैत्री”, अशी माहिती कोट्टायम जिल्हा पर्यटन प्रोत्साहन परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

रामचरणने त्याच्या आगामी ‘RC16’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सनासोबत कडपाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्याने ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांची जुनी विनंती पूर्ण केली. यावेळी तो अमीन पीर दर्ग्यातील मुशायरामध्येही सहभागी झाला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article