शरद पवारांनी आता जनतेचा जनाधार स्वीकारून घरी बसावे- राधाकृष्ण विखे:शिर्डीत विखे पाटील आणि धनंजय मुंडेंनी घेतले साईबाबांचे दर्शन

2 hours ago 1
राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीने जनाधार गमावलेला असल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. जनतेचे वाटोळे करणाऱ्या शरद पवारांनी आता इव्हीएम बोलण्यापेक्षा घरी बसावे, असा खोचक सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना दिला आहे. मोदी, शाहांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या उध्दव ठाकरेंनाही राज्यातील जनतेने चांगलाच धडा शिकवला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. लोणी येथील ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विखे पाटील यांच्याशी संवाद साधला. पत्रकारारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांच्या मनात कुठलाही किंतु परंतु नाही. मात्र माध्यमांमधून होत असलेल्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. आमची मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस हीच चॉइस असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मोदी, शाहांचे पाठबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने आजवर आपण चांगले काम करून दाख़वले. देवेंद्र फडनवीस यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही चांगले काम आपण करत राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत यश मिळाले, तर ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला, तर ईव्हीएम वाईट बोलण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवयच लागली आसल्याची टीका विखे यांनी केली. धनंजय मुंडे यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल महायुतीने स्वीकारून पुन्हा जनतेच्या हितासाठी चांगले निर्णय घेतले. त्याला राज्यातील जनतेने भरभरून पाठिंबा दिला. काँग्रेसचे काही नेते बेताल वक्तव्य करित आहेत. त्यांची जनतेने विधानसभा निवडणुकीत काय अवस्था केली, त्याची लाज सुध्दा त्यांना राहिलेली नसल्याची टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. विरोधकांनी पराभव मोठ्या मनाने मान्य करावा : मुंडे ईव्हीएमबाबत विरोधकांकडून सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. लोकसभेत महाविकास आघाडीचा विजय ईव्हीएममुळे झाला होता का, असा सवाल माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला. महायुतीला जनतेने दिलेले यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कबूल केले पाहिजे. मंत्रिपदाबाबत वरिष्ठ नेतृत्व घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील, असेही मुंडे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article